ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज आमंत्रित
भंडारा : विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक सत्रापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 15 जुलै पर्यंत सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील बारावी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकरीता मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या 2024-25 या सत्रामधील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
जात प्रमाणपत्र बंधनकारक, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला (पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के गुण आवश्यक, आधारकार्ड परीक्षेचे गुणपत्रक, बोनाफाईड सर्टिफिकेट, बँक खाते आधार सलग्न केल्याचा पुरावा, स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थी जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा) अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
योजनेंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70 टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30 टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 टक्के व महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण असेल. योजनेंतर्ग चालू शैक्षणिक सत्रात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थी, वित्तीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थी, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थी व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थी असे 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, आयटीआय समोर, श्रद्धानंदपेठ नागपूर येथे संपर्क साधावा.