चंद्रपूर शहरात पुन्हा गोळीबार …
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील आझाद बगीच्या जवळ असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमन अंधेवार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात आरोपीने अमन यांच्या अंधेवार यांच्या पाठीला गोळी मारली आहे. गोळी लागल्याने अमन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले व प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी येवून पहाणी केली आहे व लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.