डायल ११२ च्या तत्परतेने वाचले मुलीचे प्राण…

डायल ११२ च्या तत्परतेने वाचले मुलीचे प्राण…

दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी दुपारी २:४४ वाजता चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षातील डायल ११२ वर ब्रम्हपुरी येथील कॉल प्राप्त झाला की, एक २० वर्षीय युवती विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे, तेंव्हा डायल ११२ येथील रिस्पॉन्डर महिलर पोलीस अंमलदार सिंधु गुडधे यांनी तो कॉल लगेच पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे पाठवल्याने पोस्टे ब्रम्हपुरी डायल ११२ च्या कर्तव्यावरील पोलीस हवालदार बालाजी वाटेकर, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम भरडे हे लगेच घटनास्थळी पोहचुन विहीरीची पाहणी केली असता विहीरीत आंत मध्ये ती मुलगी एका लोखंडी रॉडला पकडुन असल्याचे दिसुन आल्याने दोघेही पोलीस अंमलदार लगेच विहीरीत उतरले परंतु ती मुलगी बाहेर येण्यास तयार नव्हती. तेंव्हा पोलीसांनी तिची योग्य समजुत घालुन तिचे आत्महत्या करण्याचा मनातील विचार बदलवुन तिला सुखरुप विहीरीतच्या बाहेर काढुन तिचे आईच्या स्वाधिन केले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुमम्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोनि बबन पुसाटे, पोउपनि विलास रेभनकर यांचे नेतृत्वात नियंत्रण कक्ष डायल ११२ पथक व ब्रम्हपुरी डायल ११२ पथकातील पोलीसांनी केला आहे.

पोलीसांच्या तत्परतेने एका युवतीचे प्राण वाचले यास्तव जिल्हा पोलीस अधिक्षक श्री मुमम्का सुदर्शन यांनी प्राण वाचविणारे पोलीसांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र व बक्षिस देवुन गौरविण्यात येत आहे.

तरी, याद्वारे सर्व जनतेला आवाहन करण्यात येतो की, आपातकालीन परिस्थीतीत पोलीस मदती करीता डायल ११२ वर कॉल करावा.

सदर सेवा आपातकालीन असल्याने कोणीही फेक अथवा खोटे कॉल करु नये.