फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

             भंडारा,दि.4 : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि सलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्याचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था/गट याना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार, उ‌द्यानपंडीत पुरस्कार, वसतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या अधिकारी/कर्मचारी याना पद्‌मश्री डॉ. विठ्‌ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन २०२३ या वर्षामध्ये कृषी व सलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती/गट/सस्था यांचे उपरोक्त प्रमाणे विविध कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी/गट/संस्था/व्यक्ती यांनी विविध पुरस्कार प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करणेबाबत मा. श्री. रवीद्र बिनवडे, भाप्रसे, आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, यांनी राज्यातील शेतकरी/व्यक्ती/गट/संस्था याना आवाहन केले आहे. विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तयार करणेकामी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा विभागानी कळविले आहे.