स्टॉप डायरिया अभियान संपूर्ण जिल्ह्यात सुरु
विविध उपक्रमाद्वारे ग्रामीण भागात ३१ ऑगस्ट पर्यत अभियान राबवणार
भंडारा,दि.4 : जलजन्य आजार हे पावसाळ्यात डोके वर काढतात. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरतात म्हणून ह्या काळात नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करणे हे आवश्यक आहे. ग्रांमपंचायत यांनी पाणी निर्जंतुक करून शुद्ध पाणी पुरवठा केल्यास जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट या दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत आहे.
पावसाळ्यात पाणी साठे दूषित होतात आणि हेच दूषित पाणी आणि पिऊन डायरिया,गॅस्ट्रो,कावीळ यासारखे आजार होतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुक करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना प्रतिबंध घालता येतो.
ह्या अभियानामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,महिला बालकल्याण विभाग,शिक्षण विभाग,ग्रामपंचायत विभाग आदींच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. हे अभियान एकूण आठ आठवडे चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे उपक्रम गावपातळीवर घेण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये गावातील पाणी पुरवठा स्रोत, अंगणवाड्या, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत येथील पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे व नागरिकांना,विद्यार्थी याना शुद्ध पाणी पिण्यास उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी, कर्मचारी, अशा कार्यकर्ती,पाणी पुरवठा कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये पिणाऱ्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन,स्वच्छता जनजागृती कार्यक्रम,पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे,पिण्याच्या पाण्याचे साठे तपासणे,पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता,घरगुती स्तरावरील पाणी टाक्यांची स्वच्छता,नादुरुस्थ असलेले शौचालय दुरुस्थ करणे,ग्रामस्थांना पिण्याच्या शुद्ध पाण्याबाबत आरोग्य शिक्षण देणे,कचऱ्याच्या वर्गीकरण व योग्य विल्हेवाट लावणेबाबत जागृती करण्यात येणार आहे.
उपकेंद्र स्तरावर माता व किशोरवयीन मुली यांची बैठक घेऊन वैयक्तिक स्वछता,पावसाळ्यात होणारे आजार व त्याबाबत घ्यावयाची खबरदारी बाबत मार्ग्दर्शां करण्यात येणार आहे. शाळेमध्ये आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत विद्यार्थी याना जलजन्य आजाराबाबत मार्गदर्शन करणे,चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करणे, शाळेमध्ये विशेष स्वछता मोहीम राबविण्यात येणार आहे. अभियान यशस्वी करण्याचे आव्हान जलजन्य आजाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करून गावपातळीवर अभियान यशस्वीपणे राबविण्यात यावे असे आव्हान समीर कुर्तकोटी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ मिलिंद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ मनीषा साकोडे जिल्हा माता बाळसंगोपन अधिकारी,पंचायत विभाग,शिक्षण विभाग,पाणी पुरवठा व स्वछता विभाग यांनी केले आहे