आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राकरीता
महाविद्यालयांची नोंदणी करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 4 : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टिकोणातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्यादृष्टिने ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ या योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र राज्यातील सर्व विद्यापीठाचे कुलगुरु, तंत्रशिक्षण संचालक तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठविण्यात आले आहे. ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ या योजनेंतर्गत [https://forms.gle/kUz१W७bFEFyq२६bc७] हा गुगल फार्म भरून नोंदणी करता येणार आहे. सदर योजनेच्या अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास विभागाने कळविले आहे.