शासकीय वसतिगृहात प्रवेश ऑफलाईन 31 जुलै पासून अर्ज वाटप व स्विकारणे

शासकीय वसतिगृहात प्रवेश ऑफलाईन 31 जुलै पासून अर्ज वाटप व स्विकारणे

विद्यार्थी व विद्यार्थीनींना महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

              भंडारा,दि.4 : जिल्हयात सामाजिक न्याय विभागाचे एकूण 9 वसतिगृह तसेच मुलीची निवासी शाळा कार्यान्वित असून चालू सत्रात वसतिगृहामध्ये / निवासी शाळेमध्ये खालीलप्रमाणे प्रवर्गनिहाय जागा रिक्त आहेत. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने पत्र काढून विद्यार्थी / विद्यार्थीनींना शासकीय वसतिगृहात प्रवेशाकरिता ऑफलाईन अर्ज करुन प्रवेशाची कार्यवाही करावी.

या प्रवेश अर्ज प्रत्येक वसतिगृहात उपलब्ध असून विद्यार्थी / विद्यार्थीनींना ते विनामूल्य देण्यात येतील. वसतिगृहात वर्ग-८, वर्ग-९, व व्यावसायीक व बिगर व्यावसीक प्रथम वर्षाकरिता असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश अर्ज देण्यात येतील.

अर्ज वाटप व स्वीकारणे : ३१ जुलै, २०२४ वेळापत्रक – महाविदद्यालय विभाग अव्यवसायीक पहीली निवड यादी प्रसिदध करणे : ०५ ऑगस्ट, २०२४ पहील्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत : १२ ऑगस्ट, २०२४ दुसरी निवड यादी प्रसिदध करणे : १५ ऑगस्ट २०२४ दुसऱ्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत २२ ऑगस्ट,२०२४ वसतिगृहाचे नांव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भंडारा येथे संपर्क साधावा.असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभागाचे बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे