सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी इच्छुक संस्थांना
नवीन अर्ज सादर करण्याकरीता प्रस्ताव आमंत्रित
गडचिरोली,दि.03 : सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी + 2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्याक्रमाच्या नविन संस्था व अधिकच्या तुकडयांना कायमस्वरुपी विना अनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यासाठी इच्छुक संस्थांना नवीन अर्ज सादर करण्याकरीता नोंदणी व ऑनलाईन पद्धतीने अर्ज/प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळ-https://vti.dvet.gov.in व अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.16 ऑगस्ट 2024 आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, शुल्क व व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली मानके संचालनालयाच्या वरील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. असे आयुक्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी कळविले आहे.