कृषी दिन कार्यक्रम साजरा

कृषी दिन कार्यक्रम साजरा

          भंडारा दि.01 :- दरवर्षी प्रमाणे दिनांक 17 जुन 2024 ते  दिनांक 1 जुलै 2024 या कालावधीत कृषि संजीवनी  मोहीम राबविण्याबाबत मार्गदर्शक सुचना नुसार जिल्हयात तालुका निहाय मोहीम शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी देवून, नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, सेंद्रीय शेती तसेच विविध कृषि विभागाच्या योजनाची  माहिती देण्यात आली. या मोहीमेचे  समारोह कार्यक्रम आज  कै. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त जिल्हा परिषद,सभागृह भंडारा येथे कृषि दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन मा.श्री.गंगाधर मुकुंदाजी जिभकाटे,अध्यक्ष जिल्हा परिषद,भंडारा तसेच प्रमुख उपस्थिती मा. श्री. राजेश विनोदजी सेलोकर, सभापती कृषि व पशुसंवर्धन समिती जि.प.भंडारा मा.सौ.स्वातीताई नरेंद्रजी वाघाये सभापती महीला व बालकल्याण समिती जि.प.भंडारा सौ.पुजाताई हजारे कृषी समिती सदस्या मा.सौ पटले मॅडम  जि.प.सदस्या मा.श्री.कमकलाकर रणदिवे अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,भंडारा सौ.संगीता माने,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा मा.श्री.प्रमोद पी.वानखेडे,कृषि विकास अधिकारी जि.प.भंडारा मा.श्री.विकास एम.चौधरी जिल्हा कृषी अधिकारी,जिल्हा परिषद भंडारा मा. श्री. पी.पी.गिधमारे,कृषी उपसंचालक जिल्हा अधिक्षक कार्यालय भंडारा मा.श्री.प्रकास गोपीचंद मस्के वसंतराव नाईक कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी,मा.श्री.शेषरावजी निखाडे कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.

सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांनी कै.वसंतराव नाईक यांचे फोटोचे पुजन केले त्यानंतर सन 2020, 2021,2022 या वर्षात शासन स्तरावरुन पुरस्कार जाहीर केलेल्या जिल्हयातील शेतकऱ्याचे सत्कार करण्यात आले. यामध्ये श्री.प्रकास गोपीचंद मस्के रा.डव्वा ता.जि.भंडारा, श्री.अनिल शिवलालजी किरणापुरे मु.पो.लवारी ता.साकोली जि.भंडारा श्री.स्वपनील शंकरराव नंदनवार मु.पो.पालांदूर ता.लाखनी जि.भंडारा श्री.अजय वसंताजी भुते मु.जेवनाडा ता.लाखनी जिल्हा भंडारा, श्रीमोरेश्वर खुशाल सिंगनजुडे मु.पो.कोलारी ता.लाखनी जि.भंडारा,श्री.रेशिम मोहनलाल रामटेके, कृषी पयॅवेक्षक तालुका पवनी जिल्हा भंडारा, सौ. संगीता माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा यांनी कृषि विभागाच्या संपूर्ण योजना तसेच सेंद्रीय शेती व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन उत्पादनामध्ये वाढ करण्याचे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 मा.डॉ.परवते कृषि विज्ञान केंद्र साकोली यांनी भात पिकावरील व्यवस्थापन याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हयातील वसंतराव नाईक कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मा.श्री.प्रकास गोपीचंद मस्के यांनी आपल्या मनोगतातुन भात शेती सोबत भाजीपाला पिक लागवड व नविन तंत्रज्ञानाचा वापर याबाबत मार्गदर्शन केले.  मा.श्री.राजेशजी सेलोकर सभापती, कृषि व पशुसंवर्धन समिती जि.प.भंडारा यांनी त्यांच्या भाषणातुन शेतकऱ्यांना आजच्या कृषि दिनाचे महत्व सांगून सेंद्रीय शेती भविष्यात करुन आपल्या कुटुंबाला विषरहीत अन्यधान्य उपलब्ध करुन कुटुंबाला सुदृढ बनवावे असे मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थित शेतकरी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. विकास एम. चौधरी जिल्हा कृषी अधिकारी,जिल्हा परिषद भंडारा  यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. प्रमोद पी.वानखेडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद भंडारा,यांनी केले कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी कृषि विभाग,जिल्हा परिषद,भंडारा येथिल सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी सहकार्य केले.