मनपा पथ विक्रेता समिती सदस्य पदाची निवडणूक अविरोध

मनपा पथ विक्रेता समिती सदस्य पदाची निवडणूक अविरोध

चंद्रपूर २८ जुन – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या पथविक्रेता समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत सर्वच सदस्य अविरोध निवडुन आले असुन निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त मंगेश खवले यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडणुक प्रक्रियेमध्ये विजयी उमेदवार सर्वसाधारण खुला गटातुन अजाबराव शामरावजी डंभारे,अब्दुल जावेद छोटे मिया शेख,पल्लवी राजेश वानखेडे,अनुसुचित जाती गटातुन वसंता गोमाजी वानखेडे,अनुसुचित जमाती गटातुन लक्ष्मण चंपत सुरपाम,इतर मागासवर्ग (महिला राखीव) मंजुषा अनिल झाडे,अल्पसंख्यांक (महिला राखीव) शबाना शेख जावेद शेख तर दिव्यांग गटातुन सतिश प्रभाकर मुल्लेवार यांची नगर पथ विक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
चंदपूर शहर महानगर पालिका, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पथ विक्रेता (उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन ) अधिनियम २०१४ अन्वये  महानगरपालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे विनियमन व नियंत्रण करण्याकरीता नगर पथ विक्रेता समिती अनिवार्य आहे. सदर अधिनियम २०१४ अन्वये नगर पथ विक्रेता समितीत २० सदस्य असतील. यामध्ये शासकीय विभाग व इतर मंडळे त्याच बरोबर पथविक्रेत्यांचे ८ सदस्य असतील. हे पथ विक्रेत्यांचे ८ सदस्य नोंदणीकृत पथविक्रेत्यामधुन निवडणुकीद्वारे घेण्याचे अधिनियम २०१४ मध्ये नमूद आहे. त्याचप्रमाणे मनपा अंतर्गत १८ जुन रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सदर सदस्य निवडुन आले आहेत.
याप्रसंगी शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख,चिंतेश्वर मेश्राम,पांडुरंग खडसे व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.