आरमोरी येथील आरोपीस सात वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली

आरमोरी येथील आरोपीस सात वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली

• मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. विकास एस. कुलकर्णी यांचा न्यायनिर्णय

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक ०५/०३/२०२० रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील

पोहवा/८५१ भाऊचंद गेडाम, पोअं/५७३० नितेश चांदेकर व चालक नापोअं/२०८१ रमेश बेसरा सह

आरोपी नामे अजय अरुण हजारे हा फौ.मा.क्र. २१/२०१६, अप. क्र. ६७/२०१६, कलम ३२४ भादंवि मध्ये

चंद्रपूर कारागृह येथे बंदीस्त असल्याने सदर आरोपीला दिनांक ०५/०३/२०२० रोजी मा. न्यायालय,

आरमोरी येथे पेशी तारखेवर हजर करण्याकरिता सकाळी ०६:०० वा. गडचिरोली येथुन चंद्रपूर कारागृह येथे

जाण्यास रवाना झाले. आरोपी नामे अजय अरुण हजारे यास चंद्रपूर कारागृहातून वॉरंटसह ताब्यात घेऊन

गडचिरोली येथे पोहचवून टाटा सुमो वाहन क्र. एम.एच-३३-सी-१४४ चालक पोअं/१०४७ पिरमोहम्मद

शेखसह पोहवा/८५१ भाऊचंद गेडाम, पोअं/५७३० नितेश चांदेकर यांनी आरोपी नामे अजय अरुण हजारे

यास हातकडीसह ताब्यात घेऊन मा. न्यायालय, आरमोरी येथे १३:०० वा. पोहचले. काही वेळाने न्यायालयात

मध्यान्हाची सुट्टी झाल्याने आरोपीस पेश करण्यास वेळ असल्याने सदर आरोपीस पेश करण्याकरिता

प्रतिक्षालयात थांबले असता, अंदाजे १४:४० वा. च्या सुमारास आरोपी अजय अरुण हजारे हा न्यायालयातून

हाताला असलेल्या हातकडीसह हिसका मारुन कायदेशिर रखवालीतुन पळून जावू लागला. त्यावेळेस

सोबतचा कर्मचारी नितेश चांदेकर हा सदर आरोपीस पकडण्याचा प्रयत्न करण्याकरिता धावला असता

आरोपीने न्यायालयातील तळ मजल्यावर असलेल्या भिंतीच्या लोखंडी रॉडला हिसका देवून तोडले व

शासकिय मालमत्तेचे नुकासान केले. त्या परिस्थितीत वाहन चालक पिरमोहम्मद शेख तसेच आरोपी

न्यायालयातील कोर्ट मोहरर पोअं/नागरगोजे व मंगेश दिलीप डोनाडकर, रा. कुरुड असे आरोपी अजय

अरुण हजारे यास न्यायालयाचे वॉलकंपाऊंड वरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्यास पकडले.

त्यानंतर मा. न्यायालयात दुपारी १५:०५ वा. सदर आरोपी अजय हजारे याला पेश करण्यात आले. सदर

घटनेबाबत पोस्टे आरमोरी येथे फिर्यादीच्या रिपोर्टवरुन अप. क्र. ४८/२०२०, कलम ३३२, २२४, ४२७

भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीविरुद्ध भरपुर पुरावा उपलब्ध झाल्याने दोषारोपपत्र मा. न्यायालय,

आरमोरी येथे दाखल केले. त्यावरुन सत्र खटला क्र. ३५/२०२१ नुसार खटला चालविण्यात आला. कोर्ट

विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली श्री. विकास एस. कुलकर्णी यांनी सर्व बाबींचा व

सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा योग्य व न्यायोचित म्हणून ग्राह्य धरुन आज दिनांक २७/०६/२०२४

रोजी आरोपी अजय अरुण हजारे, वय ३२ वर्षे रा. डोंबरी तह. आरमोरी, जि. गडचिरोली यास कलम २२४

भादंवि अन्वये दोषी ग्राह्य धरुन दोन वर्षे शिक्षा व कलम ३३२ भादंवि मध्ये तीन वर्षे शिक्षा तसेच कलम

४२७ मध्ये ०२ वर्षे शिक्षा ठोठावली आहे.

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्याचा तपास पोहवा / १३८१ गौतम चिकनकर, पोस्टे आरमोरी यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.