दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण

दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण

डिकेएसझेडसीएम (दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य) गिरीधर व डिव्हीसीएम संगिता याच्या आत्मसमर्पणानंतर आज रोजी कंपनी क्र. १० च्या दोन सेक्शन कमांडर यांनी केले आत्मसमर्पण.

शासनाने जाहिर केले होते एकुण १६ लाख रूपयाचे बक्षिस.

शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६६६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक २७ जून २०२४ रोजी दोन जहाल महिला माओवादी नामे १) बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. १०, वय २८ वर्ष, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व २) शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. १०, वय २९ वर्षे, रा. कटेझरी ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.