ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2024-25 करीता अर्ज आमंत्रित

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

सन 2024-25 करीता अर्ज आमंत्रित

 सन-2024-25 या सत्रापासुन “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेसाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष प्रवर्गातील 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या सन-2024-25 या सत्रामधील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनकरीता सन-2024-25 या सत्रापासुन “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” या योजनेसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे.

तरी सदर योजनेसाठी दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावे.

  1. जात प्रमाणपत्र बंधनकारक
  2. अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, (पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे)
  3. आधार कार्ड
  4. सदरचा विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
  5. 12 वी मध्ये 60% गुण मिळालेले विद्यार्थीच या योजनेस पात्र राहतील.
  6. परिक्षेचे गुणपत्रक
  7. महा. वोनाफाईड सर्टिफिकेट
  8. बँक खाते आधार संलग्न केल्याचा पुरावा
  9. स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
  10. सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.
  11. विद्यार्थी जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इ. महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र आदी.)
  12. सदर योजनेअंतर्गत एकुण प्रवेश संखेच्या 70 टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी व 30 टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी असतील.
  13. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांस या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
  14. सदर योजनेअंतर्गत 2024-25 करीता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विदयार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विदयार्थी अशा रितीने प्रती जिल्हा 600 विदयार्थ्यांना/विदयार्थ्यांना, लाभ देण्यात येईल. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे सहायक संचालक, इतर मागास, बहुजन कल्याण यांच्याकडे विहत नमुन्यात अर्ज करावा लागेल.
  15. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.