उमेद अंतर्गत महिला प्रभागसंघ व ग्रामसंघ यांच्या पुढाकाराने

उमेद अंतर्गत महिला प्रभागसंघ व ग्रामसंघ यांच्या पुढाकाराने

 प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला मिळाली अधिक चालना  -समीर कुर्तकोटी

              भंडारा दि .२२ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा अंतर्गत उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियाना मार्फत जिल्ह्यात महिला सक्षमीकरण चे काम वेगाने शुरू आहे . अभियानामार्फात महिलांना क्षमता बांधणी तसेच विविध आर्थिक पाठबळ देऊन उपजीविकेचे शाश्वत स्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न शुरू आहेत . त्याचीच फलश्रुती म्हणजे आज जिल्ह्यात महिला बचत गटांचे गावस्तारापासून ते प्रभाग्स्तारापर्यंत संघटन तयार झाले आहेत. ज्याच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सर्वांगीण विकासात्मक प्रश्नांना सोडविण्याचे काम महिला करत आहेत .

             ग्रामीण भागात सर्वांना हक्काचे घर असावे हे धोरण लक्षात घेऊन शासन प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबवत आहे. परंतु बरेचदा आर्थिक अडचणीमुळे मंजूर लाभार्थी देखील सदर योजनेचा लाभ विहित वेळेत घेऊ शकत नाही . हे लक्षात घेता भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री समीर कुर्तकोटी यांनी उमेद अभियानाच्या प्रभागस्तरीय पदाधिकारी यांच्या समोर बचत गटामार्फत अश्या लाभार्थ्यांना कर्जस्वरूपात आर्थिक पाठबळ देण्याची संकल्पना मांडली व महिलांना मार्गदर्शन करून महत्व पटवून दिले.

          यात  प्रभाग संघाच्या महिलांनी आव्हान स्वीकारत सक्रीय  पुढाकार घेतलेला आहे आणी आज रोजी संपूर्ण जिल्ह्यात मंजूर घरकुल लाभार्थी पैकी गरजू कुटुंबातील १५८४ महिलांना ५ कोटी ८३ लक्ष  रुपयाचे  कर्ज  गटामार्फत घरकुल पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून दिले आले हे विशेष. महिला पदाधिकारी स्वतः भेटी देऊन आवास योजने चे पाहणी करत आहेत ज्यामुळे घरकुलचे थांबलेले किंवा रखडलेले  काम आज पूर्ण होतांना दिसू लागले आहे..

         महिलांनी याबाबत घेतलेल्या पुढाकाराचे व कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून याकडे महिला सक्षमीकरणाचा उत्तम उदाहरण म्हणून बघितले जात आहे.