बँकांनी शासकीय योजना कर्ज प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करावा
भंडारा, दि. 21: जिल्ह्यातील सर्व बँकांचा आढावा घेणाऱ्या जिल्हा अग्रणी बँकेच्या सभेत शासकीय योजनांशी संबंधित कर्ज प्रकरणांचा लवकर व जलद गतीने निपटारा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काल दिले.
मार्च 2024 तिमाही साठी डीएलसीसी आणि डीएलआरसी ची बैठक काल झाली. जिल्हाधिकारी यांनी पीक कर्ज तसेच शासनाच्या विविध योजने अंतर्गत कर्ज मंजुरी आणि वितरणाचा त्रैमासिक आढावा घेतला.
तसेच विविध शासकीय योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणांची दखल सुद्धा घेतली आणि प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निपटारा करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले.
विविध महामंडळ याना सुद्धा त्यांच्या महामंडळाकडून जास्तीत जास्त प्रकरणे बँकेकडून मंजूर करून घ्यावीत असे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात डिजिटल पेमेंटच्या विस्तार होण्यासाठी बचत खात्यामध्ये एक तरी डिजिटल पेमेंट योजनेची व्यवस्था देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.
बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेतर्फे वार्षिक साख योजना 2024-25 च्या पुस्तकाचे विमोचन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरसेटी भंडारा यांच्यातर्फे एनुअल ऍक्टिव्हिटी रिपोर्ट 2023-24 या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण , प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा विवेक बोंद्रे , आरबीआय एलडीओ भाग्यश्री बडे ,एलडीएम् गणेश तईकर,डीडीएम नाबार्ड देवेंद्र हेडाऊ, आरसेटी डायरेक्टर मिलिंद इंगळे सर्व बँकांचे जिल्हा प्रतिनिधी डीआयसी ,केव्हीआयबी, व इतर महामंडळाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.