पलाडी येथील माळरानावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम
रोजगार हमी योजना व सामाजिक वनीकरण विभागाचा संयुक्त उपक्रम
भंडारा, दि. 21 :रोजगार हमी योजना विभाग ,जिल्हाधिकारी कार्यालय व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पलाडी येथील स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूच्या माळरानावर आज सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व प्रभारी रोहयो उपजिल्हाधिकारी लीना फलके तसेच अधीक्षक श्रीमती रोहिणी पाठराबे , तहसीलदार भंडारा विनिता लांजेवार जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांच्यासह पलाडीच्या सरपंच व त्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.
नुकत्याच लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीचे केंद्र असलेल्या पलाडी येथे ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या परिसरात मोकळ्या पठारावर माळरान आहे .तिथे वृक्षारोपण झाल्यास नजीकच्या काळामध्ये त्या वृक्ष लागवडीचा फायदा होईल व परिसरात सावली राहील. या उद्देशाने रोजगार हमी योजनेच्या प्रभारी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी आज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला अधिकारी- कर्मचारी देखील स्वयं स्फूर्तीने वटपौर्णिमेनिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
त्यावेळी एकूण वड ,पिंपळ, चिंच, फणस ,औदुंबर,महोगणी अशी देशी प्रजातीची झाडे लावण्यात आली.
या वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक लागवड अधिकारी आर. टी. मेश्राम आणि वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एन .नाईक ,पलाडी सरपंच कल्पना गोस्वामी व उपसरपंच श्वेता चामलाखे आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.