रमाई आवास योजनेत एक हजारहून अधिक लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी

रमाई आवास योजनेत एक हजारहून अधिक लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी

            भंडारा, दि.19 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत 2023 24 या कालावधीतील रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 1044 घरकुल लाभार्थ्यांना जिल्हास्तरीय समितीने घरकुल मंजुरी प्रदान केली आहे.

          यामध्ये पंचायत समिती भंडारा 162, मोहाडी ४१, तुमसर १००, साकोली 382, लाखनी 178, पवनी76, लाखांदूर 105 अशा एकूण 1044 लाभार्थ्यांना  मा.पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली समितीने मंजुरी प्रदान केली असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.