अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची डाटा ऑपरेटर पदाची
मानधनावर नियुक्ती इच्छुकांनी संपर्क साधावा
भंडारा,दि. 19 :केद्रवती अर्थसंक्लप सन २०२३ २०२४ अंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा या कार्यालयास आदिवासी भागांमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता द्विभाषिक संघटक म्हणून सुशिक्षित अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची मानधनावर नेमणुक करणे” (प्रती लाभार्थी दहा महिण्याकरीता) व आदिवासी भागांमध्ये योजनांची प्रभवी अंमलबजावणी करण्याकरीता डाटा ऑपरेटर माणून सुशिक्षित अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची मानधनावर नेमणुक करणे (प्रती लाभार्थी दहा महिण्याकरीता) या दोन योजना मंजुर असुन सदर योजना करिता अर्ज मागविण्यात येत आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी द्विभाषिक संघटक व डाटा ऑपरेटर करोता अनु. जमातीच्या दाखला (उपविभागीय अधिकारी यांची स्वाक्षरीने) अर्जदाराचा उत्पन्न दाखला शैक्षणिक अर्हता प्राप्त कागदपत्रे अर्जदाराचे एम.एस सि आय टी / संगणक प्रमाणपत्र व मराठी / इंग्रजी टाईयपिंग प्रमाणपत्र आवश्यक वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह कार्यालयात कार्यालयीन वेळेत २५.जून,२०२४ पर्यत कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा रंभाड बिल्डींग, पोलिस अधिक्षक कार्यालयाजवळ एल.आय.सी. ऑफिस रोड भंडारा येथे सादर करावे. असे आवाहन श्री. निरज सु. मोरे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांनी कळविले आहे.