कंत्राटी तत्वावर सफाई कामगाराची नियुक्ती
जिल्ह्यातील इच्छुक सुशिक्षित बेरोजगारांनी 26 जून पर्यत अर्ज सादर करावी,
भंडारा,दि.19 : सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाकडून जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी अर्ज सादर करा प्राचार्य शासकीय औदयोगीक प्रशिक्षण संस्था तुमसर व मुख्यधापक, शासकीय तंत्र व माध्यमीक शाळा केंद्र, भंडारा तसेच प्राचार्य शासकीय औदयोगीक प्रशिक्षण संस्था पवनी या संस्थांना संस्थेतील स्वच्छता गृह व परीसरातील साफसफाईची कामे करण्याकरीता कंत्राटी तत्वावर सफाईगार कामगारांची आवश्यकता असून सदर कामगार हा 11 महिन्याच्या कालवधी करीता अपेक्षीत आहे.
जिल्हयातील इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थानी 26 जून, २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सायंकाळी ५.४५ पर्यंत) प्रस्ताव सादर करावे त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच कामाच्या अटी व शर्ती चा सविस्तर तपशिल जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, शिवाजी स्टेडीयम, भंडारा यांच्या सुचना फलकावर पहावयास उपलब्ध आहेत.असे आवाहन सहाय्यक आयुक्त,जिलहा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा यांनी कळविले आहे.