ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे सभासद व्हा जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचे आवाहन 

ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे सभासद व्हा

जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचे आवाहन 

         भंडारा,दि.19 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडारा हे शासकीय ग्रंथालय असून या कार्यालयाच्या  वतीने जिल्यातील जनतेला ग्रंथालय व अभ्यासिकेची विनामुल्य सोय उपलब्ध करुन देण्यात येते तथापी ग्रंथ घेवून जावून वाचन करण्यासाठी ग्रंथालयाचे सभासद होणे आवश्यक असून वाचनप्रेमी नागरिकांनी सभासद व्हावेत असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा यांनी कळविण्यात येत आहे.

           जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हे लालबहादुर शास्त्री शाळेजवळ, स्टेशन रोड, शास्त्री चौक, भंडारा येथे असून ग्रंथालय व अभ्यासिका सुविधा विनामुल्य आहे. या ग्रंथालयात विविध विषयांवरील दर्जेदार ८४५८१ ग्रंथसंपदा असून त्यांची ई-ग्रंथालय आज्ञावलीमध्ये नोंद करण्यात आली आहे. ग्रंथालयात दैनिक, नियतकालिके व इतर वाचन साहित्य वाचकांना उपलब्ध करून देण्यात येते. तथापी ग्रंथ घरी नेण्यासाठी जिल्हा ग्रंथालयाचे वैयक्तिक सभासद तसेच शाळा, महाविद्यालय, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, खाजगी संस्था यांना संस्था सभासद होणे आवश्यक आहे. त्यासाठी (वैयक्तिक सभासद अनामत रक्कम ५०० रूपये (परतावा) व अर्ज व प्रवेश शुल्क ११० रूपये द्विवार्षिक) तसेच संस्था सभासद होण्यासाठी अनामत रक्कम २५०० रूपये (परतावा) व अर्ज प्रवेश शुल्क ७७५/- रूपये द्विवाधिक इतके आहे.

         ग्रंथ देवघेव व इतर ग्रंथालयीन सेवा ई-ग्रंथालय आज्ञावलीद्वारे उपलब्ध करून देण्यात येते तरी जिल्हयातील नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच शाळा, महाविद्यालय, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, खाजगी संस्था यांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावेत व वाचन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. खु.भं. बोपचे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.