गडचिरोली जिल्हा पोलीस भरती -२०२४ ची मैदानी चाचणी जाहिर

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती -२०२४ ची मैदानी चाचणी जाहिर

• दि १९ जुन पासुन पोलीस शिपाई चालक पदभरतीस प्रारंभ

• दि. २१ जुन पासुन पोलीस शिपाई पदभरतीस प्रारंभ

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२०२३ (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २०२४) १० जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २०२४) ९१२ जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणीची तारिख जाहिर झालेली असून ती दिनांक १९/०६/२०२४ ते १२/०७/२०२४ या कालावधीत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली पोलीस शिपाई चालकच्या १० पदाकरिता २२५८ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले असुन त्यापैकी १९६७ पुरुष उमेदवार व २९१ महिला उमेदवार यांचे आहेत. तसेच पोलीस शिपाईच्या ९१२ पदाकरिता एकुण २४५७० उमेदवारांनी अर्ज सादर केले असुन त्यापैकी १६८०३ पुरुष उमेदवार व ७७६७ महिला उमेदवार यांचे आहेत. पोलीस शिपाई चालक पदाच्या एकुण १० जागांपैकी अनुसुचित जाति ०१, अनुसुचित जमाति-०२, भज (ब)-०१, भज (क)- ०१, इमाव-०२, एसईबीसी-०१, इडब्ल्युएस-०१, अराखीव-०१ अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती दि. १९/०६/२०२४ ते २०/०६/२०२४ या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. यासोबतच पोलीस शिपाई पदाच्या एकुण ९१२ जागांपैकी अनुसुचित जाति-१२१, अनुसुचित जमाति-२१०, विज (अ)-५४, भज (ब)-५०, भज (क) ५७, भज (ड)-४६, विमाप्र ४६, इमाव- १५८, एसईबीसी-५०, इडब्ल्युएस-५०, अराखीव ७० अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती दि.२१/०६/२०२४ ते १२/०७/२०२४ या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. पोलीस शिपाई चालक पदाकरीता दरदिवशी सरासरी १००० उमेदवारांची व पोलीस शिपाई पदाकरीता दरदिवशी सरासरी १३०० उमेदवारांची शारिरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाच्या मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी, सर्व उमेदवारांनी आपले मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी (शारिरीक) चाचणी परिक्षेची तारिख लक्षात घेऊन मैदानी (शारिरीक) चाचणी करीता आवश्यक कागदपत्रासह पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहणेबाबत गडचिरोली पोलीस दलामार्फत कळविण्यात येत आहे.