18 जून रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

18 जून रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

चंद्रपूर : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन व चवथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जून महिन्यात तिसरा सोमवार हा 17 जून रोजी आल्यामुळे या दिवशी बकरी ईद दिनानिमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहिर आहे. शासन निर्णयानुसार सुट्टीचा दिवसानंतर येणारा दिवस महिला लोकशाही दिन राबविण्याचे निर्देश आहे. त्यानुसार जून महिन्याचा महिला लोकशाही दिन 18 जून रोजी सकाळी 11 वा. निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे दालनात आयोजित करण्यात आला आहे.

सदर महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ट प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, व विहीत अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सेडून तक्रार/ निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असतील अशा तक्रारी माहिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसा पूर्वी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरिय महिला लोकशाही दिनास प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल.