केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी उपलब्ध

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी उपलब्ध

            भंडारा,दि.12 : महाराष्ट्र शासन इतर मागासवर्ग समाजिक व शैक्षणिक मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि व विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग, शासन निर्णय क्र.सीबीसी-2019 प्र.क्र. 127/मावक, दि. 06 सप्टे 2019 अन्वये सन 2020-21 या वर्षापासून केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देणेबाबतच्या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे.

            या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील महिलांकरिता सवलतीस पात्र नवउद्‌योजक महिला यानी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरित सबसिडी च्या अनुषंगाने नवउद्‌योजकाना प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येते. यासाठी बँकेमार्फत प्रकल्प कर्ज मंजुर करुन घेतलेल्या धनगर समाजातील महिलांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भडारा येथे संपर्क करावा,असे आवाहन बाबासाहेब देशमुख सहाय्यक आयुक्त, भडारा यांनी केले आहे.