गोंदिया -नागभीड -चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या दोन दिवस बंद

गोंदिया -नागभीड -चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या दोन दिवस बंद.

येत्या १९ व २० जून ला गोंदिया -नागभीड -चांदाफोर्ट या मार्गावरील सर्व सुपर एक्स्प्रेस, पॅसेंजर, मालगाड्या या दोन दिवस बंद राहणार आहे. त्या संबंधी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर झोनने एका पत्रा द्वारे कळविले आहे. गोंदिया जवळील हिरडामाली येथे १४ तासाचे काही तांत्रिक काम करणार आहे. या रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या दोन दिवसां साठी बंद करुन, या रेल्वे गाड्या नागपूर मार्गे वळविण्यात आल्या आहेत.या मार्गावर दररोज साप्ताहिक सुपर फास्ट एक्सप्रेस,मालगाड्या,व गोंदिया -बल्लारशाहा ह्या  पॅसेंजर गाड्या धावतात. हा रेल्वे मार्ग सर्वच गाड्या साठी सोयीचा  आहे. १४ तासाचे काही तांत्रिक काम असल्याने या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या दोन दिवस बंद राहणार आहे.अशी अधिसूचना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर झोनने काढली आहे.त्यासाठी प्रवाशांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.