पंचायत समिती भामरागड तर्फे ‘मिशन पुना आकी’चा आरंभ

पंचायत समिती भामरागड तर्फे ‘मिशन पुना आकी’चा आरंभ

गडचिरोली दि. ११ : भामरागड तालुक्यातील लोकांच्या आधार कार्ड व जन्म दाखला मिळण्यासंबंधीच्या अडचणी सोडवण्याकरिता तसेच महिला आरोग्यावर जनजागृती व्हावी याकरिता पं.स.भामरागड तर्फे आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत ‘मिशन पुना आकी’ म्हणजेच ‘मिशन नवी पालवी’ ही मोहीम हाती घेतली आहे.