डॉक्टर भालचंद्र स्मृतीदिनानिमित्त कारागृहामधील कैदी व कर्मचाऱ्यांची नेत्र शिबिर संपन्न

डॉक्टर भालचंद्र स्मृतीदिनानिमित्त कारागृहामधील कैदी व कर्मचाऱ्यांची नेत्र शिबिर संपन्न

           भंडारा,दि.11 : जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम व जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वागये आणि डॉक्टर रेखा धकाते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर भालचंद्र स्मृतीदिन सप्ताह निमित्त जिल्हा कारागृह येथे नेत्र शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये कारागृहामधील १९८ कैदी व २० कर्मचारी ची तपासणी करण्यात आली. तपासणीचे कार्य नेत्रचिकित्सा अधिकारी संजय शेंडे व डॉक्टर श्रुती बडे प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनी केली.

          यावेळी उपस्थित त्यांना नेत्रदान समुपदेशक सोनाली लांबट यांनी नेत्रदानाची माहिती देऊन समुपदेशन केले असता ७ कायद्यांनी नेत्रदानाचे संकल्प पत्र भरून दिले व ३ कैद्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.