पेरिव धान लागवडीमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा पुढाकार
धान शेतीतील उत्पादकता वाढविण्याच्या व उत्पादन खर्च कमी करणाच्या दृष्टीने तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच भात लागवड पध्दतीमध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे यावर उपाय म्हणुन कृषी विज्ञान केंद्र साकोली तर्फे अनेक वर्षापासून प्रयोग राबविल्या जात आहे व याचाच परिणाम म्हणुन साकोली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पेरिव धान पद्धतीसाठी धान पेरणी यंत्राचा वापर करतांना दिसत आहेत. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. घनशामजी पारधी रा. किन्ही मोखे यांनी पेरीव धान पध्दती करीता पुढाकार घेतला आहे. यांनी पेरणी यंत्राच्या सहाय्याने ०४ एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे.
श्री. घनशामजी पारधी यांनी आपले मनोगात व्यक्त करतांना सांगितले की , मजुरांचा तुटवडा हि एक जागतिक समस्या असून त्यावर यांत्रिकीकरण हाच पर्याय आहे. बदलत्या हवामानानुसारवापरासोबतच भात लागवड पध्दतीमध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे व यासाठी आधुनिक यंत्र व अवजारे यांचा वापर करणे अनिवार्य आहे. निविष्ठांचा कार्यक्षम वापर,वेळेवर व योग्य मात्रेत खते-बीयाणे पेरणी,वेळेवर शेती कामाची पूर्तता, उत्पादन खर्चात घट, शेतीतील कष्ट कमी करणे, कीड रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो. रोवणी पद्धतीने होणाऱ्या उत्पादना एवढेच उत्पादन यामुळे होते परंतु रोवणी पद्धतीत चिखलणी, धानाची रोपवाटिका तयार करणे, व्यवस्थापन, रोपांची वाहतूक करणे व पुर्नलागवड (रोवणी) करणे यांसारखे वेळखाऊ व जास्त खर्चाचे कामे यामुळे कमी होते. अद्यापही पाहिजे तितक्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यात आधुनिक यंत्र व अवजारे वापर होतांना दिसत नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
यासाठी बायर डायरेक्ट एकर्सचे श्री. संजय सिंह (मार्केट डेवलपमेंट अग्रोनोमिस्ट), श्री. महेन्द्र जामुनपाणे (क्लस्टर इंचार्ज) श्री.योगेश महल्ले विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी ) व श्री. मोहन कापगते (फील्ड ऑफिसरबायर डायरेक्ट एकर्स) यांनी सहकार्य केले. थेट पेरिव धान लागवड ही यंत्रांनी व्हावी यासाठी श्री. विवेक परशुरामकर (साकोली) यांच्याशी समन्वय साधता येईल.आतापर्यंत जवळपास साकोली व लाखनी तालुक्यात ५० एकर वरून अधिक पेरिव धान लागवड पेरणी यंत्राचा वापर करून करण्यात आली आहे. पेरिव धान लागवडीचे क्षेत्र वाढवावे असे आवाहन डॉ. उषा डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी शेतकऱ्यांना केले आहे.