अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु
15 जून पर्यत अर्ज सादर करा समाज कल्याण विभागाचे आवाहन
भंडारा, दि.11 : जवाहरनगर – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता इयत्ता ६ वी ते १० वी च्या विध्यार्थ्यांसाठी ऑफलाईन सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इयत्ता ६ वी च्या ४० जागेसाठी आणि इयत्ता सातवी, आठवी, नववी व दहावीच्या प्रवर्ग निहाय रिक्त जागेकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रवेशा करिता आरक्षण अनुसूचित जाती ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के, दिव्यांग प्रवर्ग ३ टक्के अशा प्रकारे प्रवेश करता येते.
प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, विध्यार्थ्याचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकांचे समंतीपत्र आवश्यक आहे. ज्या विध्यार्थीनिना शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी निवासी शाळा राजेदहेगाव येथून दिनांक १५ जून २०२४ पर्यंत अर्ज प्राप्त करून सादर करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा व मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे यांनी केले आहे.