जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

शासनाने जाहिर केले होते एकुण ०२ लाख रूपयाचे बक्षिस.

शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६६३ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक १० जून २०२४ रोजी एकुण ०२ लाख रुपये बक्षिस असलेला जहाल माओवादी नामे किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके वय ३७ वर्ष रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांनी त्याचे हस्तांतरण गडचिरोली पोलीस दलाकडे केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

नामे किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके

➤ दलममधील कार्यकाळ

सन २०१४ मध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून (भामरागड दलम) मध्ये भरती होवून सन २०१५

पर्यंत कार्यरत होता.

सन २०१५ मध्ये डीएकेएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना) मध्ये अध्यक्ष पदावर

पदोन्नती होवून सन २०१८ पर्यंत कार्यरत.

सन २०१८ मध्ये आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्यूशनरी पिपल काउंसिल) सदस्य म्हणून सन २०२२ पर्यंत कार्यरत.

सन २०२२ पासून भामरागड दलम सदस्य व आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) चा अध्यक्ष पदावर पदोन्नती होवून आजपावेतो कार्यरत.

> कार्यकाळात केलेले गुन्हे

• चकमक ०३

सन २०१७ मध्ये मौजा दरबा पहाडी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

सन २०२१ मध्ये मौजा कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

सन २०२२ मध्ये मौजा पेनगुंडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

• खून ०४

सन २०१५ मध्ये मौजा मल्लमपड्डर तलावाजवळील रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या

खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

• सन २०१८ मध्ये मौजा गोंगवाडा टी-पॉइंट जवळ झालेल्या एका निरपराध महिलेच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

सन २०१९ मध्ये मौजा जूवी नाल्याजवळ झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

सन २०२३ मध्ये मौजा पेनगुंडा ते गोंगवाडाकडे जाणाऱ्या कच्या रोडवर झालेल्या एका निरपराध

• जाळपोळ ०४

सन २०२१ मध्ये मौजा मरकनार ते मुरुमभूशी रोड जंगल परिसरात वाहनांची जाळपोळ करण्यात

त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

सन २०२२ मध्ये मौजा बोटनफुंडी ते विसामुंडी रोड जंगल परिसरात वाहनांची जाळपोळ करण्यात

त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

सन २०२२ मध्ये मौजा पेनगुंडा रोड जंगल परिसरात जेसीबी व ट्रॅक्टर वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

सन २०२३ मध्ये मौजा हिदुर गावाजवळ रोड कामावरील ४ (१ जेसीबी, ३ ट्रॅक्टर) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

• ईतर – ०२

सन २०२१ मध्ये मौजा कोठी ते कोठी टोला रोडवर माओवादी बॅनर व पत्रके लावण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

सन २०२३ मध्ये मौजा नेलगुंडा जंगल परिसरात जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

> आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.

दलममधील सोबतच्या सदस्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य व नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे.

दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता / जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतःसाठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.

वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.

> शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

महाराष्ट्र शासनाने किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके याचेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

> आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके

याला एकुण ४ लाख ५० हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच

शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी

सन २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण १५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलीस महानिरीक्षक

(नक्षलविरोधी अभियान) नागपूर श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री.

अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. जगदीश मीणा, पोलीस अधीक्षक

गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांण्डट ३७ बटा. सिआरपीएफ श्री. एम.एच. खोब्रागडे, पोलीस अधीक्षक,

विशेष कृती दल नागपूर श्री. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नक्षलविरोधी अभियान

नागपूर श्रीमती. ज्योत्स्ना मसराम, सपोनि. जितेंद्र वैरागडे, पोहवा/प्रमोद पुरी सह सीआरपीएफ ३७ बटा. बी-

कंपणीने पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की,

विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर

असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य

प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल

सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.