धान खरेदी अपहार प्रकरणात आणखी एका आरोपीतास अटक

धान खरेदी अपहार प्रकरणात आणखी एका आरोपीतास अटक

• आरोपीतांची संख्या झाली 03

• विपनन निरीक्षकास दिनांक १५ जून २०२४ पर्यंत पोलीस कोठडी

गडचिरोली जिल्ह्यातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२०२३ या दरम्यान झालेल्या अपहार प्रकरणात यापुर्वी दोन आरोपीतांना अटक करण्यात आली असुन त्यांना दिनांक १५/०६/२०२४ पावेतो पोलीस कोठडी मिळालेली आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात दिनांक ०६/०६/२०२४ रोजी राकेश सहदेव मडावी, वय ३४ वर्षे, व्यवसाय नोकरी (प्रतवारीकार तथा विपनन निरीक्षक आदिवासी विकास महामंडळ, घोट) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक ०६/०६/२०२४ रोजी अटक करुन दिनांक ०७/०६/२०२४ रोजी मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय, चामोर्शी येथे हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास दिनांक १५/०६/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरचे प्रकरण धान खरेदी घोटाळ्याशी संबंधित असल्याने आणखी काही आरोपीतांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व मा. अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात सपोनि. राहुल आव्हाड, पोउपनि सरीता मरकाम, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.