सामुहिक विवाह सोहळयात भाग घेणाऱ्या इच्छुकांनी दांम्पत्यां कन्यादान योजनाचे लाभ घ्यावा,
भंडारा,दि.07 : महाराष्ट शासन सामाजिक न्याय विभागामार्फत सामुहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणा-या अनुसूचीत जाती व नवबौध्द दांपत्याकरीता कन्यादान योजना सन 2002-03 पासून सुरु करण्यात आलेली आहे.सदर योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणा-या वधुचे पालकास रुपये 20,000/- संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे रुपये 4000/- इतके अनुदान देण्यात येते.
सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात येत असून सामूहिक विवाह सोहळयात भाग घेवून विवाह करणा-या दांम्पत्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांचेकडे सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणा-या संस्थेमार्फत आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे. अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.असे आवाहन सहाय्यक ओयुक्त, समाज कल्याण, भंडारा विभागानी कळविले आहे.