बाल धोरण कृती आराखड्याबाबत हरकती व सूचना आमंत्रित

बाल धोरण कृती आराखड्याबाबत हरकती व सूचना आमंत्रित

चंद्रपूर, दि. 7 : महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 मसुदा तयार केला  आहे.

सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा  हा इंग्रजी  व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in व  https:www.wedcommpune.com  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आले असून त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. बाल धोरण व कृती आराखड्यामध्ये आवश्यक बाबी, सुचना सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने  हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात येत आहे.

            प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022  च्या संदर्भाने नागरीकांच्या हरकती व सूचना दिनांक 30 जून 2024 रोजी सांयकाळी 6.15 वा. पर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, २८ राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे – 01 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.