औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
अर्ज 30 जून पर्यत ऑनलाईन पद्धतीने करावे
भंडारा,दि.07 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा येथील प्रवेश प्रक्रिया 03 जून,2024 पासून सुरु करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 30 जून,2024 पर्यत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहितीपुस्तीका ऑनलाईन स्वरुपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित सादर करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे.प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांलाबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे.यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा येथे एकुण 10 व्यवसाय उपलब्ध असून 280 इतक्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणिचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 4 नविन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.तसेच आय. टि. आय. प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली असून 500/- प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येते. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनाही लागु करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांने आयटीआय अभ्यासकम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने आयटीआय अभ्यासकम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते.
तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, आयटीआय मधून व्यवसायिक शिक्षण पुर्ण करुन त्वरीत रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा.असे आवाहन प्राचार्य शासकीय औैद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा यांनी कळविले आहे.तसेच आय टी आय मध्ये सुरु असलेले व्यवसाय खालीलप्रमाणे आहेत. एक वर्षिय अभ्यासकम:- संधाता, मेकॅनिक, डिझेल, कारपेंटर,पीपीओ,व दोन वर्षीय अभ्यासक्रम :- विजतंत्री, कातारी, यंत्रकारागीर, आर. ए. सी, फिटर, मोटारमेकॅनिक इच्छुकांनी संस्था मध्ये संपर्क साधावा.