मातोश्री विद्यालय, नवरगावची 100 टक्के निकालाची परंपरा ठेवली कायम

मातोश्री विद्यालय, नवरगावची 100 टक्के निकालाची परंपरा ठेवली कायम

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव या ठिकाणी असलेल्या मातोश्री विद्यालयाची 10 वी चि बोर्डाची परीक्षेचा निकाल जाहीर झाले. नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत म्हणजेच दहावीच्या निकालातदरवर्षी प्रमाणे याही वर्षी मातोश्री विद्यालय, नवरगावचा निकाल100 टक्के लागला आहे. ‘सिंदेवाही तालुक्यातील सतत(8वेळा)100 टक्के निकाल देणारी मराठी माध्यमाची(सेमी इंग्रजी)शाळा’अशी यशस्वी परंपरा या शाळेने कायम राखली आहे.100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत असतांनाच यावर्षी विद्यालयातून कु. तक्षक तथागत खोब्रागडे-82.4 टक्के-प्रथम, विनय नारायण ढाले-78.8 टक्के-द्वितीय, वैष्णव सु.बगडे-78.4 टक्के-तिसरे स्थान प्राप्त केले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी प्राविण्य, प्रथम श्रेणीत गुण प्राप्त करून विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मातोश्री विद्यालयाचे संस्थापक- सचिव श्री.अनिलरावजी गभणे,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.सौ वनिता अनिल गभणे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले आहे.