माकडाच्या हल्ल्यात मुलगी जखमी / सिंदेवाही शहरात माकडांचा हौदोस
सिंदेवाही :- वास्तवात सिंदेवाही शहरात माकडांचा धुमाकूळ सुरू असून शहरातील प्रभाग क्रमांक ३ येथे जवळपास सायंकाळी सहाच्या सुमारास मुले अंगणात खेळत असताना अचानक एकापाठून एक माकडे आली. तेव्हा गौतमी प्रविण नागदेवते वय १० वर्ष ही मुलगी आपल्या घरच्या दरवाज्यात बसून मुलांचा खेळ बघत असताना माकडाने तिला दरवाज्यात येऊन चावा घेतला. लगेच गौतमी हिला स्थानीय ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन त्यावर उपचार केला. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचार करिता तिला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रवाना केले. सद्यस्थितीत माकडांचा शहरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू असून प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. करिता सदर बाबीची दाखल घेऊन वन अधिकारी यांनी माकडांचा बंदोबस्त करावा अशी त्या प्रभागातील लोकांची मागणी आहे.