शासकीय कोट्यातील प्रवेशासाठी ३ जून पासून www.maa.ac.in अर्ज भरण्यास सुरुवात 

शासकीय कोट्यातील प्रवेशासाठी ३ जून पासून www.maa.ac.in अर्ज भरण्यास सुरुवात 

         भंडारा,दि.05: शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी डी.एल.एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे.याबाबतचे वेळापत्रक,ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सुचना,प्रथम वर्ष प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे यांचे www.maa.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

        शासकीय कोट्यातील प्रवेशासाठी दि ०३/०६/२०१४ पासून www.maa.ac.in अर्ज भरण्यास सुरुवात अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग २०० खुला संवर्ग वगळून अन्य मागासवर्गासाठी रूपये 100 असे राहील.उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र व शुल्क भरावे लागेल.

          प्रवेश अर्ज शुल्क स्विकारण्याची पध्दती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन Payment gateway/ E-Wallet किवा नातेवाईकाचे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे स्विकारले जातील,

         प्रवेश पात्रता प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता बारावी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५० टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान 44.50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

         व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.उमेदवारांना प्रवेश अर्ज करताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वत :च्या registered Email वरुन  Support @ deledadmission या Email वर पाठवाव्यात.

     प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाईल, याबाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही, त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणी आवश्यक आहे.असे आवाहन विभागप्रमुख तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,डॉ.कल्पना बानकर भंडारा यांनी कळविले आहे.