अंगणवाडी पर्यवेक्षिका” व “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पदांचा निकाल जि.प.पदभरती

अंगणवाडी पर्यवेक्षिका” व “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पदांचा निकाल जि.प.पदभरती

 भंडारा : ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद भंडारा मधील गट-क संवर्गाची पदभरती 2023 अंतर्गत “अंगणवाडी पर्यवेक्षिका” व “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पदांची एकत्रित गुणानुक्रमे यादी (Combined List), आय.बी.पी.एस. कंपनीच्या वॉटरमार्क (Watermark) सह जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळ www.bhandarazp.org वर दिनांक 5 जून, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

            उपरोक्त “अंगणवाडी पर्यवेक्षिका” व “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ” या दोन्ही पदांकरिता गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी दिनांक 14 जून,2024 रोजी (शुक्रवारला) करण्यात येणार असुन संबंधित उमेदवारांना ई-मेल व भ्रमणध्वनीद्वारे स्वतंत्ररित्या अवगत करण्यात येईल.असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.)  जिल्हा परिषद, भंडारा यांनी कळवले आहे.