भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारनिहाय मतदान

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारनिहाय मतदान

भंडारा –भंडारा गोंदीया लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शांततापूर्ण वातावरणात पार पडली.या  लोकसभा मतदारसंघातून कॉग्रेसचे उमेदवार  डॉ.प्रशांत यादवराव पडोळे यांना मतमोजणीच्या बत्तीसाव्या फेरीअखेर सर्वाधिक 5 लाख 87 हजार 413मते मिळाली. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी  भाजपाचे  सुनील मेंढे  33 हजार 380 मतांनी पराभव केला. त्यांना एकूण 5 लाख 50 हजार 033 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी त्यांना विजयी झाल्याबद्दल निवडणूक प्रमाणपत्र   प्रदान केले.

उमेदवारनिहाय मतदान पुढीलप्रमाणे :  संजय कुंभलकर यांना 25 हजार 462, अजयकुमार भारतीय 4057  देवीलाल नेपाले 2009,विलास लेंडे 1649, संजय केवट 24858,डॉ.आकाश जीभकाटे 1981, शरद इटवले 1028,चेतराम कोकासे 791,तुळशीराम गेडाम 842,प्रदीप ढोबळे 1196,बेनीराम फुलबांधे 1497, विरेंद्रकुमार जैस्वाल 2389,विलास राऊत 1616,सुमीत पांडे 3719,सुर्यकीरण नंदागवळी 1162,सेवक वाघाये 13103, असे एकुण 12 लाख 24 हजार 805 वैध  मते,

 तर 10 हजार 268 मतदारांनी नोटाला मते दिली. अवैध मते 2061 ठरली.