अहिल्यादेवी बालसदन घोट येथील बालिकेने मिळवले 82.80 टक्के
गडचिरोली :महिला व बाल विकास विभागांतर्गत सर्वच जिल्ह्यात काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरीता बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. गडचिरोली येथे दोन बालगृह सुरु असून त्यापैकी शासकीय बालगृह गडचिरोली व अहिल्यादेवी बालसदन घोट कार्यान्वित आहेत. अहिल्यादेवी बालगृह घोट येथे प्रवेशित बालकांपैकी माध्यमिक शालांत परिक्षेत एकुण 06 बालिकेने परिक्षा दिली होती. त्यापैकी एकुण सर्वच 6 बालिकेने चांगल्या प्रकारे गुण यश संपादित केले.
त्यापैकी एका बालिकेने विज्ञान शाखेतुन 82.80 टक्के घेऊन उर्त्तीण झाली. तर दुसऱ्या बालिकेने 62.60, तिसऱ्या बालिकेने 68.40, चवथ्या बालिकेने 73.80, पाचव्या बालिकेने 70.40 तर सहाव्या बालिकेने कला शाखेतुन 58.60 घेवून उर्त्तीण झाले आहेत. हे सर्वच बालिका बालगृहात राहुन शिक्षण घेत होते. यांच्या यशाबद्दल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, अध्यक्ष बाल कल्याण समिती वर्षा मनवर, सदस्य काशीनाथ देवगडे, दिनेश बोरकुटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, अहिल्यादेवी बालसदन घोट येथील अधिक्षीका ललिता गुजुर, यांनी सर्वच बालिकेचे कौतुक केले आहे.