निवृत्तीवेतन धारकांना सुचना
भंडारा,दि.30 : सन 2023-2024 मध्ये आयकर कपाती करतांना असे लक्षात आले की, निवृत्ती वेतनधारकांचे पॅन कार्ड Inoperative आहे. त्यामुळे आधारकार्ड हे पॅनकार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आधारकार्ड हे पॅनकार्डशी ऑनलाईन जोडणी झाल्याची खात्री सुविधा केंद्रामार्फत करावी जर तशी जोडणी झालेली नसेल त्यांनी तात्काळ जोडणी ऑनलाईन सुविधा केंद्रामार्फत करण्यात यावी.ज्या निवृत्तीवेतनधारकाच्या आधारकार्ड हे पॅनकार्डशी जोडणी न झाल्याचे दिसुन आल्यास आणि त्यांचे आयकर कपात वार्षिक उत्पन्नावर 20% प्रमाणे कपात करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले यांनी कळविले आहे.