शिंगाडा लागवड तंत्रज्ञान जनजागृती कार्यशाळा संपन्न

शिंगाडा लागवड तंत्रज्ञान जनजागृती कार्यशाळा संपन्न

          भंडारा,दि.29 : शेतकऱ्यांनी धान पिकाला पर्यायी पिक म्हणून शिंगाडा पिकाची लागवड करावी, ज्या खोलगट बांधीमध्ये पावसाळ्यात वाहून जाणारे जास्तीचे पाणी साचून ठेवता येत असेल , खोलगट बांधी किंवा ज्या शेतकऱ्यांकडे तीन ते चार महिने पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी शिंगाडा पिकाची आधुनिक तंत्रज्ञान वापरून लागवड करावी, पूर्व विदर्भात शिंगाडा पिकाचे क्षेत्र वाढविणे करिता तसेच शिंगाडा पिकाला पिक म्हणून मान्यता देणेकरीता शासन स्तराहून प्रयन्त होत आहेत, शिंगाडा हे पिक नवीन आहे परंतु जास्त नफा देणारे पिक असून याचे मानवी आरोग्याला खूप फायदे आहेत, तीन महिन्यात येणारे पिक असल्यमुळे  शेतकऱ्यांनी शिंगाडा पिकाची लागवड करावी असे प्रतिपादन डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले ते कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) इथे आयोजित शिंगाडा लागवड तंत्रज्ञान जनजागृती कार्यशाळा कार्यक्रमात बोलत होत्या.

           जिल्हाधिकारी भंडारा यांच्या निर्देशानुसार, कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) यांचे वतीने धान शेतीला पर्यायी पिक म्हणून शेतकरी बंधूना/ ग्रामीण युवकांना शेतकरी क्षमता बांधणी कार्यक्रम अंतर्गत शिंगाडा लागवड तंत्रज्ञान जनजागृती कार्यशाळाया कार्यक्रमाचे आयोजन 25 मे,2024 रोजी, कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) इथे आयोजित करण्यात आलेले होते. सध्या काही विशिष्ठ लोक पारंपारिक पद्धतीने शिंगाडा पिक घेतात. शेतकरी जर या पिकाकडे वळले तर शेती मधून अधिक नफा मिळू शकतो त्या करिता युवा वर्गानी पुढे यावे. इतर पिकांप्रमाणे शिंगाडा पिकाचे सुधारित वाण आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे शिंगाडाचे विविध पदार्थ तयार होतात व त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्तम मागणी आहे या पिकाकडे दुर्लक्षित पीक म्हणून न बघता पैसे देणारे पीक म्हणून बघितले जावे करिता आव्हान केले आहे.

          सदर  कार्यक्रमाला डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, समीर परवेज, सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त मत्यव्यवसाय, मारोती चांदेवार, तज्ञ मार्गदर्शक, मत्स्यशेती, प्रमोद पर्वते, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली, कु. कांचन तायडे, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली व इतर अतिथी व भंडारा –गोंदिया जिह्यातील शेतकरी उपस्थित होते.

        समीर परवेज, सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त मत्यव्यवसाय यांनी  जलजीविका संस्था मार्फत आयोजित विविध उपक्रमांची माहिती देऊन, सदर प्रशिक्षण च्या माध्यमातून आपला विकास साधावा तसेच मत्स्यशेती ची  शेतीला जोड देऊन आर्थिक नफा मिळवावा असे सांगितले तसेच प्रशिक्षणार्थीना व्यवसायाकरिता शुभेच्छा दिल्या. श्री. मारोती चांदेवार, तज्ञ मार्गदर्शक, मत्स्यशेती यांनी मत्स्यशेती बाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कु. कांचन तायडे, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी फळपिक लागवड अंतर्गत शेवगा पिक लागवड बाबत माहिती दिली.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रेश्मा तावडे, जलजीविका, पुणे श्री, तर आभार प्रदर्शन कु. प्रेरणा कष्टी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता. प्रमोद पर्वते, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली,  श्री. कपिल गायकवाड, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी प्रयत्न केले.