आर. टी .ई.प्रवेश प्रक्रिया 31 मे,पर्यत पालकांनी मुदतीत प्रवेश प्रक्रिया करावी
सन २०२४-२५ वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित शैक्षणिक घटकाकारिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि १७ मे, पासून सुरू करण्यात आली आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 मे,2024 असून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठीत केलेल्या समितीस बालकांचे प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे.करिता पालकांची मुदतीच्या आत अर्ज भरणे आवश्यक आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेस दि. ३१ मे, २०२४ नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद विभागानी कळविले आहे.