पोस्टे गडचिरोली येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १,३५,७९,३३६/- रुपयांचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

पोस्टे गडचिरोली येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १,३५,७९,३३६/- रुपयांचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे गडचिरोली हद्यीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे गडचिरोली येथील सन २०१७ ते २०२३ या कालावधीतील दाखल एकुण ५१० गुन्हयामधील मुद्देमाल महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये एकुण किंमत १,३५,७९,३३६/- (अक्षरीः- एक कोटी पसतीस लाख एकोनऐंशी हजार तीनशे छत्तीस) रुपयांचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल दिनांक १३/०५/२०२४ रोजी नष्ट करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे आहे की, मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने दिनांक १३/०५/२०२४ रोजी पोस्टे गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. चं. वि. भगत यांच्यासह पोस्टे गडचिरोली हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुद्येमाल नष्ट केला. ज्यात १) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ११०२१२ प्लास्टीक बाटल्या २) विदेशी दारुच्या २०० मिली मापाच्या २७ प्लास्टीक बाटल्या ३) विदेशी दारुच्या ७५० मिली मापाच्या १०१ काचेच्या बाटल्या ४) विदेशी दारुच्या ३७५ मिली मापाच्या ८७ काचेच्या बाटल्या ५) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या १७१७६ काचेच्या बाटल्या ६) बिअरच्या ६५० मिली मापाच्या बियरच्या २३ काचेच्या बाटल्या ७) बिअरच्या ५०० मिली मापाच्या बियरच्या ७९० टिनाचे कॅन याप्रमाणे एकुण १,३५,७९,३३६/- (अक्षरीः एक कोटी पसतीस लाख एकोनपैंशी हजार तीनशे छत्तीस) रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जेसीबिच्या सहाय्याने १५ x १५ चा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीबीच्या सहाय्याने खड्यात टाकुन खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोली येथील प्रभारी अधिकारी अरुण फेगडे, पोहवा / चंद्रभान मडावी व सर्व अंमलदार यांचे उपस्थीतीत पार पडली.