अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व 50,000 हजार रुपये

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व 50,000 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली

• मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय

सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन चामोर्शी येथे दि. ०३/११/२०१९ रोजी फिर्यादी (पीडीता) मुलगी वय १६ वर्षे हीने फिर्याद दिली की, ती शिक्षण घेण्याकरिता मौजा चामोर्शी येथे आपले आजोबाकडे राहावयास होती. आरोपी नामे राहुल दिलीप लटारे, वय २३ वर्षे, रा. गव्हार मोहला, तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हा पिडीता ही शाळेत जात असतांना तिच्या मागे मागे जायचा, परंतु पिडीता ही त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. त्यानंतर आरोपीने पिडीताला वारंवार मोबाईलवर फोन करुन, पिडीता सोबत प्रेम प्रकरण सुरु केले व तिला फिरायला घेऊन जायचा. तसेच आरोपी हा त्याचे घरी एकटा असतांना पिडीताला घरी बोलावुन तिच्याशी शारिरीक संबंध करित होता. तसेच मित्राच्या घरी सुध्दा बोलावुन तिच्याबरोबर शारिरीक संबंध करित होता. त्यानंतर आरोपीने पिडीता बरोबर असलेले संबंध तोडुन तुझ्याशी लग्न करणार नाही तसेच तु माझ्याशी बोलायचे नाही, असे म्हणुन भांडण केले. आरोपीने पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असुन सुध्दा तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार शारिरीक संबंध केले.

अशा फिर्यादीच्या (पिडीता) तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे चामोर्शी येथे दि. ०३/११/२०१९ ला अप. क्र. ४१०/२०१९ अन्वये कलम ३७६ (२) (एन) (जे) भादवी तसेच सहकलम ४,६ (एन) बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२, कायदयान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस दिनांक ०३/११/२०१९ रोजी २०.१९ वा. अटक करून, तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. ८०/२०१९ नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक १४/०५/२०२४ रोजी आरोपी राहुल दिलीप लटारे, वय २३ वर्षे, रा. गव्हार मोहला, तह. चामोर्शी, जि. गडचिरोली यास मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांनी आरोपीस कलम ३७६ भादवी, सहकलम ४,६ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२ मध्ये दोषी ठरवुन २० वर्षे सश्रम कारावास व 50,000 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहीले, तसेच गुन्हयाचा तपास मपोउपनि. निशा खोब्रागडे पोस्टे चामोर्शी यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.