टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला

गडचिरोली पोलीस व माओवादी चकमकीत तीन जहाल माओवादी ठार

• टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला

• एक डीव्हीसीएम (Divisional Committee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक कंपनी सदस्य व एक दलम सदस्य यांना ठार करण्यात यश

• महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण २२ लाखाचे बक्षिस

• घटनास्थळावरून ०३ अॅटोमॅटीक वेपन जप्त

• या चकमकिने पेरिमीली दलममधील संपूर्ण सदस्यांचा झाला खात्मा

आज दिनांक १३/०५/२०२४ रोजी सकाळी टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही माओवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे दोन पथक तातडीने सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आले. सदर माओवादविरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०१ पुरुष व ०२ महिला माओवादी मृत अवस्थेत आढळले असुन सदर मृतक माओवाद्यांची ओळख पटली आहे.

१) वासु समर कोरचा, रा. गोडीया, पूर्व बस्तर एरीया (छ.ग.) (डीव्हीसीएम) :-

> कमांडर, पेरमिली दलम

> खुन १, चकमक ५ व दरोडा १ असे एकुण ०७ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये त्याचा

प्रत्यक्ष समावेश होता.

> शासनाने त्याचेवर एकुण १६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

२) रेश्मा मडकाम, वय २५ वर्षे, रा. बस्तर एरिया (छ.ग.)

> सदस्य, कंपनी १०, नुकतीच पेरिमीली दलममध्ये जबाबदारी देण्यात आलेली होती.

> खुन १, चकमक ५ असे एकुण ०६ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होता.

> शासनाने त्याचेवर एकुण ०४ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

३) कमला मडावी, वय २४ वर्षे, रा. दक्षिण बस्तर एरीया (छ.ग.)

> सदस्य, पेरमिली दलम

> खुन २, चकमक ५ असे एकुण ०७ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होता.

> शासनाने त्याचेवर एकुण ०२ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

यासोबतच सदर घटनास्थळावरुन ०१ नग एके ४७ रायफल, ०१ नग कार्बाइन रायफल, ०१ नग इन्सास रायफल व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.

सदर अभियान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. एम. रमेश सा. व पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे. तसेच सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.