ज्येष्ठ नागरिकांनी उत्तम आरोग्यासाठी योग साधना अवलंबवावी – डॉक्टर बी. एच . दाभेरे

ज्येष्ठ नागरिकांनी उत्तम आरोग्यासाठी योग साधना अवलंबवावी – डॉक्टर बी. एच . दाभेरे
इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर तर्फे स्थानिक आझाद बगीच्या येथे जागतिक रेड क्रॉस दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर बी. एच.दाभेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉक्टर बी. एच.दाभेरे म्हणाले की संपूर्ण आयुष्य संकटाचा सामना करत यशस्वी जीवन जगण्याऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जगमान्य अशी योग साधनेची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन जीवनात करावी. तसेच यथायोग्य औषधोपचार घेत असताना आवश्यक त्या रक्त चाचण्या देखील कराव्या आणि आपले आयुष्य आरोग्यदायी ठेवावे. या कार्यक्रमाच्या दरम्यान एन.सी.डी. विभागातर्फे उपस्थित जनसमुदायाची सामान्य रुग्णालय  यांच्या मार्फत निशुल्क रक्तदाब व शर्करा तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मंगेश गुलवाडे सचिव रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर यांनी केले. व या कार्यक्रमांमध्ये विशेष उपस्थिती म्हणून पुष्पाताई गुलवाडे, छबुताई वैरागडे,अश्विनीताई खोब्रागडे, डॉक्टर आशिष बारब्दे, अँड प्रीती शहा, नरेंद्र भुते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे तर आभार पियुष मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष मुरस्कर,आरिफ काझी, रुपेश ताकसांडे यांनी अथक परिश्रम घेतले.