चंद्रपूर जिल्ह्यातील शेळी व मेंढी पशुधनाची संख्या एक लाखाच्या वर आहेत. पावसाळ्यामध्ये चराई पास धारकांना चराई केंद्रावर व चराई क्षेत्रावर जनावरांसाठी चराईच्या प्रलंबित मागणीचे निवेदन भाजपा चंद्रपूर जिल्ह्याचे महामंत्री व धनगर जमात सेवा मंडळ चे अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात धनगर समाज यांच्या नेतृत्वात श्वेता बोड्डू उप- वनसंरक्षण यांची भेट घेतली या भेटीच्या दरम्यान शेडी मेंढी जनावरांना पाच साठी व त्यांना स्थलांतरित करण्यासाठी दोन दिवसा ऐवजी पाच दिवसाच्या कालावधी करावा तसे निवेदन दिले. तसेच या निवेदनाची प्रत पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दिली.
या शिष्टमंडळामध्ये धनगर समाजातील गंगाराम तळोदी येथील भानेश येगेवार, मल्लाजी येगेवार, गणपती येगेवार, तिरुपती येगेवार, बी. कनलवार, प्रवीण गिलबिले, मयूर भोकरे, पवन ढवळे,डॉक्टर यशवंत कन्नमवार,राजेश्वर पारेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.