जलतरण तलाव क्रिडा सुविधेचा लाभ घ्यावा – जिल्हा क्रीडा अधिकारी
जिल्हयातील खेळ संस्कृतीचा विकास होण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथील जलतरण तलाव क्रीडा सुविधा 15 मे, 2024 पासून भंडारा जिल्हयातील खेळाडू व नागरीकांसाठी सुरु करण्यात येत आहे. तसेच जलतरण तलाव सदस्य नोंदणी फार्म दि.13/05/2024 पासून कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून इच्छुकांनी आपली नोंदणी निश्चित करावी.
तरी जिल्हयातील शाळा/महाविद्यालयातील खेळाडू/विद्यार्थी तसेच नागरीक यांनी जलतरण तलावाचा लाभ घ्यावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे यांनी आवाहन केले आहे.