ट्राफिक पोलिसांना उस्माघाताबद्दल प्रसिद्ध डॉक्टरांचे मार्गदर्शन

ट्राफिक पोलिसांना उस्माघाताबद्दल प्रसिद्ध डॉक्टरांचे मार्गदर्शन
जागतिक रेड क्रॉस कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर मंगेश गुलवाडे यांचे प्रतिपादन

इंडियन रेड क्रॉस सोसायटी, आय. एम.ए.व ट्राफिक पोलीस विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 मे 2024 रोजी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा करण्यात आला,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक ट्राफिक  कार्यालयातील आवारात ट्रॅफिक पोलिसांसाठी उष्माघाता बद्दल च्या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी म्हटले की, आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या आरोग्याची यथायोग्य काळजी घ्यावी.
डॉक्टर प्रवीण पंत सचिव आय. एम. ए.व डॉक्टर रोहन कोटकर यांनी उष्माघातापासून बचाव करताना भरपूर पाणी प्यावे, सैल कपडे घालावे,जास्त वेळ उन्हात राहाणे टाळावे अशा प्रकारची खबरदारी घ्यावी म्हणून सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,डॉक्टर बीडी पालीवाल,डॉक्टर शर्मिली पोद्दार, छबूताई वैरागडे,अश्विनी खोब्रागडे,प्रीती शहा, प्रवीण गिलबिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व पोलीस कर्मचारी बंधू आणि भगिनींना उष्माघातासाठी बचाव करण्यासाठी ग्लुकोज पावडर, इलेक्ट्रॉल पावडर यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर कल्पना गुलवाडे तर आभार प्रदर्शन पियुष मेश्राम यांनी मानले .