उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना

उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना

 सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून या महिण्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो तसेच त्यामुळे मृत्यूही होणे संभवनीय असते.

उष्माघात होण्याची कारणे-

१) उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे.

२) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे

३) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये  काम करणे.

४) घटट कपडयांचा वापर करणे.

अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

लक्षणे-

प्रौढांमध्ये

१)         शरीराचे तापमान 104 फॅटन्हाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास

२)         स्नायूंचे आखडणे

३)         मळमळणे, उलटीचा भास होणे

४)         गरम, लाल आणि कोरडी त्वचा

५)         चिंता वाटणे व चक्कर येणे

६)         हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे

७)         मानसिक संवेदनशीलता दिशाहीनता, भ्रम, गोंधळ, चिडचिड, अॅटॅक्सिया, झटका किंवा कोमात जाणे.

 लहान मुलांमध्ये

1)         आहार घेण्यास नकार

2)        चिडचिड होणे

3)        लघवीचे कमी झालेले प्रमाण

4)        शुष्क डोळे

5)        सुस्ती/ मानसिक भ्रम  सारखी स्थिती

6)        कुठूनही रक्तस्त्राव होणे

7)        तोंडाच्या येथील त्वचा कोरडी होणे

प्रतिबंधक उपाय :-

१)         वाढत्या तापमाणात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.

२)         कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत

३)         उष्णता शोषक कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.

४)         पिण्याचे पाणी/ज्यूस सोबत ठेवा आणि हायड्रेटेड रहा.

५)         अधुनमधुन उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.

६)         वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम थांबवावे  व उपचार सुरु करावे.

७)         उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपकरणे यांचा वापर करावा

८)         अनवाणी बाहेर जाऊ नका

उपचार –

१) रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलीत खोलीत ठेवावेत

२) रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

३) रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पटटया ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत.

४) रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.

५) आवश्यकतेनुसार सलाईन देणे.

उष्माघाताच्या रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अथवा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती व्हावे असे डॉ. मिलींद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सचिन चव्हान, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, डॉ. श्रीकांत आंबेकर, जिल्हा साथरोग तज्ञ, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा यांनी आवाहन केले आहे.